"माझे लग्न वधु वर सूचक-कोल्हापुर " चेअरमन पप्पू उर्फ़ प्रफुल्ल गणपतराव लोहार
"लग्न" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्ति मधील सामाजिक बंधन आहे. हिन्दू धर्मियात हा संस्कार आहे.
तर अन्य धर्मियात हा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. लग्न संस्था ही संस्कृतिस आणि उपसंस्कृतिस अनुलक्षून विविध पद्धतिनि पति पत्नी मधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. लग्नामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन.
१३ जानेवारी २०१८ रोजी " माझे लग्न वधु वर सूचक केंद्राची" स्थापना स्वअनुभवतुन करण्यात आली. सध्याच्या धावपळीच्या व धगधगीच्या जीवनात नातेसंबंध हे दुरावत चालले आहेत. आपल्या मनाप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे योग्य जोड़ीदार मिळावा ही प्रत्येक मुला मुलींची तसेच पालकांची इच्छा असते, त्यासाठी अनेक नवस ही केले जातात पण लग्न जमवण्यासाठी चांगल्या वधु-वर सुचकाची ही गरज असते हे लक्षात घेतले पाहिजे. आज पर्यन्त अनेक विवाह इच्छुक मुला मुलींच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम "माझे लग्न" ने केले आहे. त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जपली आहे व योग्य मार्गदर्शन ही इथेच केले जाते.
"www.mazelagna.in" या वेबसाईट वरुन, कोठेही धावा-धाव, शोधा-शोध करत बसण्यापेक्षा घरबसल्या आपल्याला मनासारखा योग्य जोड़ीदार मिळून जाईल यात शंका नाही.
Registration झाले नंतर Login मधून आपली सर्व माहिती Update करावी