|| श्री गणेशाय नम: ||
|| जय विश्वकर्मा ||

"माझे लग्न वधू-वर केंद्र"

"पांचाळ-सुतार-लोहार समाजासाठी अग्रणी विवाह केंद्र"

 • 1) वधू-वारांची नाव नोंदणी मोफत राहील

 • 2) वधू वारांची अधिक माहिती पाहिजे असल्यास केंद्राचा प्लान घेवून माहिती घेणे

 • 3) प्लानची फी वेबसाईट वरील Online Payment Gateway वरून नेट बँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडीट कार्डने भरता येईल किवा आमच्या बँकेच्या खात्यावर नेट बँकिंग / चेकने जमा करता येईल. चेक "माझे लग्न वधू-वर सूचक" या नावाने काढावा.
  Account Type : Current Account
  Bank Name : CBI Bank
  Account No. : 3655089948
  IFSC Code : CBIN0280645.
  Name : Maze Lagna
  Branch : Laxmipuri, Kolhapur

  Please inform Transaction ID / Date / Amount / Your Bank Name & Place by email / Phone / SMS, Once you transfer the money.

 • 4) जे प्लान दिले आहेत त्याप्रमाणे वधू वरांची माहिती घेणे नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही.

 • 5) खरेदी केलेल्या प्लान इतकीच स्थळे पाहता येतील

 • 6) १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी अथवा २१ वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा यांची नाव नोंदणी “विवाह कायद्याने गुन्हा आहे”

 • 7) पालक पाल्यांनी एकदा भरलेली नोंदणी फी हि इतर कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

 • 8) अॅप व वेबसाईट वरून मिळविलेल्या माहितीचा गैरवापर करू नये, तसे निदर्शनास आल्यास सभासत्व रद्द केले जाईल. तसेच भविष्यातील समस्येत “माझे लग्न” केंद्र जबाबदार राहणार नाही.

 • 9) अॅप व वेबसाईटवर जाहीर केलेल्या मुल तसेच अनेक एछिक सेवांमध्ये बदल करणे / वाढविणे / दुरुस्ती करणे / सुधारणा करणे / तहकूब करणे / काढून टाकणे / समाप्त करणे इत्यादी अधिकार “माझे लग्न” केंद्र स्वतःकडे राखून ठेवत आहे.

 • 10) अॅप व वेबसाईटवर बायोडाटा व फोटो टाकल्यानंतर तो तपासून तसेच दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी हि सभासदांची आहे. त्यानंतर बायोडाटा अथवा फोटो मध्ये होणाऱ्या बदलास “माझे लग्न” केंद्र जबाबदार राहणार नाही.

 • 11) नाव नोंदणी केल्यावर सभासदांना अॅप व वेबसाईटवर नोदणी केलेल्या स्थळांची माहिती घर बसल्या पहावयास मिळेल.

 • 12) अॅप व वेबसाईटवर मुलामुलींची फोटोसह संपूर्ण माहिती दिली जाते. त्यामुळे माहिती व फोटो पाठविण्याचा वेळ व पैसा वाचू शकेल.

 • 13) अॅप व वेबसाईटवरून मिळालेली वधू वारांची माहिती हि ज्या त्या पालक व पाल्यांनी दिलेल्या माहितीनुसार असेल त्याची खातरजमा (सत्यता-असत्यता) प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्या त्या पालक व पाल्यांनी करून घेणे गरजेचे आहे व सदर तपशिलाबाबत भविष्यातील विवाह विषयक / इतर कोणत्याही तक्रारीस “माझे लग्न” वधू वर केंद्र जबाबदार राहणार नाही.

 • 14) आमच्या वधू वर केंद्रात सर्व जातीच्या विवाह इच्छुक वधू वारांची नाव नोंदणी होते.

 • 15) सभासदाने पसंत असलेल्या स्थळाशी संपर्क स्वत करावा व स्थळांच्या माहितीची खातरजमा करूनच घ्यांवी नंतर भावी आयुष्याचा निर्णय घ्यावा.

 • 16) नाव नोंदणी नंतर विवाह खात्रीने जमेलच अशी हमी देता येत नाही. केंद्रात आज रोजी जी स्थळे उपलब्ध आहेत टी पाहता येतील. आपल्याला अपेक्षित स्थळे मिळेपर्यंत प्रतिक्षेची तयारी असावी तथापि पालकांनी स्थळांसाठी सतत विचारणा करू नये, आपले सहकार्य हे मोलाचे आहे.

 • 17) एखाद्या वधूचा किंवा वरचा नकार येत असेल तर फोन वरून त्रास देणे, इतर मार्गाने त्रास देणे, छेड छाड करणे इत्यादी आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

 • 18) विवाह ठरल्यानंतर तात्काळ कळवावे व नाव रद्द करावे अन्यथा होणाऱ्या फोन संपर्क / पत्रव्यवहारास मंडळ जबाबदार राहणार नाही.

 • 19) उपलब्ध वधू वरांच्या संपर्क माहितीच्या आधारे आपण एकमेकांशी संवाद साधू शकता व अनुरूप जोडीदार शोधू शकता परंतु माझे लग्न वधू वर सूचक केंद्र या बाबत कोणत्याही प्रकारची मध्यस्थी करत नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

 • 20) नाव नोंदणी करणाऱ्यांनी आपल्या स्थळाची माहिती खरी द्यावी, हि त्याची नैतिक जबाबदारी आहे, यात काही असत्य असल्यास त्याची सर्व कायदेशीर जबाबदारी नाव नोंदणी करणाऱ्याची राहील.

 • 21) पसंती नंतर मुलांच्या / मुलींचे पै पाहुणे, स्वभाव, वर्तणूक, रोगराई, प्रेम प्रकरण, व्यसन, स्थावर शैक्षणिक पात्रता, नोकरी, व्यवसाय यासंबंधी चौकशी परस्परांनी आपापल्या जबाबदारीवर करणेची आहे.

 • 22) नोंदणीचा कालावधी नोंदणीपासून १ वर्षाचा / ६ महिन्याचा राहील. त्यांनंतर पुन्हा नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

 • 23) आमच्या अॅप व वेबसाईटवर देण्यात येणाऱ्या सूचना, नियम व अटी मान्य असतील तरच आमच्या केंद्रात नोंदणी करावी.

 • 24) प्रत्येक वधू-वर पालकास अपेक्षित स्थळ निवडण्यास स्वातंत्र्य आहे. माहिती स्व जबाबदारीवर घेणे.